मुंबई: शिवसेनेचे नेते सचिन अहीर हे देखील लवकरच भाजपमध्ये दिसतील, असे भाकित सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधानपरिषदेत बोलताना केले आहे. विरोधकांची अवस्था अश्वत्थाम्यासारखी होणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.परिवार ही मेरी पहचान, असे काम भाजप करीत नाही, असे सांगत त्यांनी बरोबर आहे ना खडसेसाहेब असे म्हणत त्यांना ही टोला लगावला.
विधानसभेत बोलताना सचिन अहीर यांनी भाजपचे 105 आमदार सध्या त्यागच करीत असल्याची टिप्पणी मुनगंटीवार यांच्याकडे बघून केली होती. त्यांना प्रत्युत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, सचिनभाऊ…मी आज एक भविष्यवाणी करतो. एक दिवस सचिन अहिरसुद्धा भाजपसोबत असतील. मी गंमत नाही करत, मी गांभीर्याने सांगतो. अनिल परब यांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझे नाव बदला, असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते अनिल परबांनाही टोला लगावला.
सचिन अहीर लवकरच भाजपमध्ये दिसतील-सुधीर मुनगंटीवार
Artical Blog
Hindi News
Artical Blog
















