अमरावती. नागपूर पाठोपाठ अमरावती जिल्ह्यातही ‘एच ३ एन २’ बाधित रुग्ण आढळून आला आहे (After Nagpur, ‘H3N2’ infected patients have also been found in Amravati district). गुरुवारी रात्री त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले (He was admitted to the district hospital ) आहे. हा रुग्ण शहरालगतच्या अकोली परिसरातील (Akoli area) असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला तीव्र स्वरूपाचा ताप खोकला असल्याने तपासण्या करण्यात आल्या. प्रयोगशाळेत केलेल्या तपासण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. या विषाणू संसर्गाचा जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण ठरला असून आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. कर्मचारी संपावर असताना हा ‘एच३ एन२’ या आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. जिल्हा रुग्णालयात विशेष दक्षतेखाली रुग्णावर उपचार सुरू आहेत. आरोग्य यंत्रणेला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. ‘एच ३ एन २’ अन्य विषाणूंप्रमाणेच संसर्गजण्य आजार आहे. पण, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य उपचाराने तो बरा होतो. दाखल करण्यात आलेला रुग्णसुद्धा नॉर्मल असल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
सर्दी-खोकला, ताप, अशक्तपणा येणे, ओकारी होणे, हगवण लागणे, तापाचा प्रकार अशी लक्षणे हा संसर्गझालेल्या रुग्णात आढळून येतात. रोग प्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे व कोरोनाप्रमाणेच प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. असून घाबरून जाण्यासारखे कारण नसल्याची स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एच३ एन२’ आढळून आलेल्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आला आहे. जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील सर्व विभागाचे कर्मचारी संपावर गेले आहे. आरोग्य विभागातील कर्मचारीसुद्धा मोठ्या प्रमाणात संपावर गेल्यामुळे त्याचा ताण आरोग्य यंत्रणेवर आला आहे. परंतु, जिल्हा रुग्णालयातील 62 शिपाई व सफाई कर्मचारी शुक्रवारी सकाळी कामावर परतले ही बाब दिलासादायी ठरली आहे.
आतापर्यंत नागपुरात दोन ‘एच३ एन२’ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपाच्या मृत्यू विश्लेषण समितीने या दोन्ही मृत्यूसाठी ‘एच३ एन२’ विषाणूची लागन नव्हे तर अन्य आजार कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.