
नागपूर. जिवापाड प्रेम केले त्या प्रेयसीने लग्नाला नकार दिला. प्रियकर हा नकार पचवू शकला नाही. तो कमालीचा निराश झाला. यातूनच त्याने प्रथम हाताची नस कापली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging ) केली. कळमन्यात ही घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने आत्महत्या केल्याचे समजताच तरुणी कुटुंबासह फसार झाल्याचे समजते. सुनील (21) रा. कळमना असे मृत प्रियकराचे नाव आहे. शाळेत असल्यापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दहाव्या वर्गात शिकत असतानाच आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीसोबत सुनीलची मैत्री झाली. तेव्हापासूनच दोघांचेही प्रेमप्रकरण सुरू होते. पुढे दोघांनीही एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतला व लग्न करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी वयाच्या 16 व्या वर्षीच लग्न करण्यासाठी तयार झाली. दोघांनीही घरातून पळ काढला. मात्र, ती अल्पवयीन असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी पोलिसांत अपहरण केल्याची तक्रार दिली. त्यामुळे सुनीलवर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, त्या नंतरही दोघांच्याही भेटी-गाठी सुरूच राहिल्या. आतामात्र तिने एनवेळी लग्नाला नकार दिला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविले (Suicide due to refusal of marriage).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयसीचा नकार पचवू न शकलेल्या प्रियकराने ब्लेडने हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला व नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील बुटीबोरीतील टायरच्या कंपनीत नोकरीला लागला. 18 वर्षे पूर्ण झाल्यामुळे आता लग्न करण्यासाठी दोघेही प्रयत्नात होते. 9 मार्चला त्याने रियाने त्याची भेट घेतली. तिने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे सुनील नैराश्यात गेला. त्याने हाताची नस ब्लेडने कापली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले. तो स्वत:ला खोलीत कोंडून घेऊन एकटा राहायला लागला होता. अशातच त्याने 15 मार्चला दुपारच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ बाजारातून घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सुनीलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यामुळे प्रेयसीवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुनीलच्या घरच्यांनी केली आहे.