
अकोला. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital ) ओल्या बाळंतीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची (committed suicide by hanging herself ) धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. या महिलेचे १५ दिवसांपूर्वीच बाळाला जन्म दिला होता. त्याला रुग्णालयात दाखल होते. बाळावर उपचार सुरू असतानाच तिने टोकाचे पाऊल उचलले. आईची सर्वाधिक गरज असते, नेमके त्याच वेळी या बाळाने आईचे छत्र गमावले (The baby lost the mother’s love) आहे. या घटनेनंतर समाजातून हळहळ व्यक्त केली जात आहे. सासरच्यांच्या छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. गोदावरी राजेश खिल्लारे (२५) रा. वाशीम असे मृत महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजे, 15 दिवसांच्या बाळावर सर्वोपचार रुगण्णालयात अनआयसीयू कक्षात उपचार सुरू होते. यादरम्यान बुधवारपासून आई बेपत्ता झाली होती. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. पोलिसांकडून आईचा सर्वत्र शोध सुरू होता.
शुक्रवारी रुग्णालयाचे सफाई कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आले. त्यांना शौचालयाचा दरवाजा आतून बंद दिसला. कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला असता त्यांना आतमध्ये महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. याबाब पोलिसांना कळविण्यात आले. शहर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.
बाळांना इतरत्र हलविले
ही घटना समोर आल्यानंतर संभाव्य धोका लक्षात घेत तातडीने एनआयसीयू कक्षात उपचारासाटी दाखल बालकांना इतरत्र हलविण्यात आले आहे. कर्मचारी संपावर असल्याने मुलांना शिफ्ट करण्यात काहीशा अडचणी आल्या. पण, सर्वांच्या सहकार्याने तातडीने ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.
दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या
मृतदेहाच्या अवस्थेवरून महिलेने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाचे अनेक कर्मचारी संपावर आहेत. यामुळे व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. शौचालयांची नियमित सफाई करणेही अशक्य झाले आहे. यामुळेच ही घटना उघडकीस येण्यास विलंब लागला. सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास दिल्यानेच महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.