नागपूर. सार्वजनिक ठिकाणी बळजबरी वसुलीच्या तक्रारींनंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police ) तृतीयपंथीवर कारवाईचा बडगा उगारला आहे (Action has been taken against transgender). कुणाच्याही इच्छेपेक्षा अधिकच्या रकमेसाठी बळजबरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानंतरही तृतीयपंथींकडून बिदागी मागताना बळजबरी केली जात आहे. अशाच प्रकारे धमकावून अधिकचे 10 रुपये मागून तृतीयपंथींनी आफत ओढवून घेतली आहे. दुकानदाराच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी तीन तृतीयपंथींवर खंडणीचा गुन्हा दाखल (A case of extortion has been registered against three transgender) करण्यात आला आहे. जिया राजपूत (21), जोजो जॉन (30) आणि ललीता मडावी (25) अशी आरोपी तृतीयपंथीची नावे आहेत. यापूर्वीसुद्धा अशाप्रकारे तृतीयपंथींवर शहर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. तृतीयपंथी सार्वजनिक ठिकाणी व्यावसायिक किंवा वाहनचालकांकडून बळजबरीने वसुली करीत असल्याच्या तक्रारी होत्या. ऐवढेच नाही तर, शहरातील लग्न सोहळे असलेल्या घरी जाऊन तृतीयपंती बळजबरीने मोठी रक्कम उकळत होते. विरोध केल्यास शिव्य शाप दिल्या जायच्या. अख्या शहरात त्यांची सहशत निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असल्याने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
तिघेही मानकापूर झोपडपट्टीस वास्तव्यास आहेत. बिदागी मागून ते गुजराण भागवितात. नागपूर पोलिस दलाच्या आदेशानुसर पैशांची मागणी करताना बळजबरी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतरही हे तिघेही दुकानांमध्ये जाऊन बळजबरीने पैशांची मागणी करीत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गुरुवारी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ते इतवारीतील किराणा ओळी परिसरात दुकानदारांकडून पैसे मागत फिरत होते. याच भागात लाडपुरा, इतवारी येथील रहिवासी आर्जव डोनगावकर (26) यांचे अरिहंत मेवा अँड किराणा भंडार नावाने प्रतिष्ठान आहे. तिघेही त्यांच्या दुकानात बिदागी मागण्यासाठी गेले होते. डोनगावकर यांनी यांनी 20 रुपये देऊ केले. पण, तृतीयपंथींनी 50 रुपये देण्यास सांगितले. डोनगावकर यांनी अधिक पैसे देण्यास नकार दिला असता ‘तुमने हमको पैसे नही दिया तो तुम्हाला बुरा होगा’, अशाप्रकारचे वक्तव्य केले. त्यामुळे व्यथित होऊन डोनगावकर यांनी 30 रुपये दिले. इच्छेपेक्षा अधिक रक्कम बळजबरीने घेतल्याणे डोनगावकर यांनी तहसील ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.