‘समृद्धी’वर पुन्हा भीषण अपघात : तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह ताब्यातील आरोपी गंभीर जखमी
वर्धा. भरधाव पोलिस वाहन मगून ट्रकवर धडकले (speeding police vehicle then hit the truck). या भीषण अपघातात महिला पोलिस निरीक्षकाचा (lady police inspector ) मृत्यू झाला. तर, तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह त्यांच्या ताब्यातील आरोपीसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. अपघातग्रस्त पोलिस वाहनाचा अगदी चेंदामेंदा झाला आहे. यावरून अपघाताची तीव्रता लक्षात येते. शनिवारी सकाळी ६.३० ते ७ वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर पांढरकवढानजीक (Near Pandharkatha village on Samriddhi highway ) ही घटना घडली. तुर्त सर्व जखमींना उपचारासाठी सावंगी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या उपाययोजना करूनही या मार्गावर अपघातांची मालिका कायमच आहे. अपघाताचा सापळा असा या महामार्गाचा उल्लेख केला जाऊ लागला आहे. यामुळे अनेक वाहनचालक आता हा मार्ग टाळण्याचा विचार करू लागले आहेत.
पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण असे मृताचे तर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हरयाणा येथील पंचकुला पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन सहकारी कर्मचारी परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन एचआर. ०३ जी.व्ही. १७८२ क्रमांकाच्या बोलेरो पोलिस वाहनाने नागपूरकडे जात होते. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा गावाजवळ पोलिस वाहन समोरील एम.एच. १७ बी.झेड. ६५७७ क्रमांकाच्या ट्रकला मागाहून धडकले. या भीषण अपघातात पोलिस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात पोलिस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पोलिस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तसेच जाम महामार्ग पोलिसही अपघातस्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली.