नवी दिल्लीः गुजरातमध्ये अभूतपूर्व विजय मिळविणाऱ्या भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये पराभवाचा धक्का बसला. हिमाचलमध्ये काँग्रेसने बाजी मारून भाजपकडून सत्ता खेचून आणली. हिमाचलमध्ये काँग्रेसने तब्बल ४० जागांवर (Himachal Pradesh Election Results 2022) आघाडी घेतली आहे. तर भाजपला 2५ जागांवर आघाडी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला 43.9 टक्के भाजपला 43 टक्के मते मिळाली आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे हिमाचल प्रदेशचे असल्याने हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याचे मानले जात आहे. हिमाचलमध्ये भाजपच्या पराभवाची वेगवेगळी कारणे सांगितली जात असून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न बदलणे तसेच अंतर्गत कलहावर नियंत्रण मिळविण्यात आलेले अपयश ही अपयशाची कारणे सांगितली जात आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता राखण्यासाठी भाजपने पूर्ण प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह स्टार प्रचारक हिमाचल प्रदेशमध्ये प्रचारासाठी मैदानात उतरले होते. पण भाजपला सत्ता राखण्यात अपयश आले व काँग्रेसने बाजी मारली. हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलण्याची भाजपमध्ये होती. पण पक्षाने ती गांभीर्याने न घेतल्याचा व अंतर्गत कलहाचा फटका भाजपला हिमाचल प्रदेशमध्ये बसल्याचे जाणकरांचे मत आहे. भाजपचे अनेक स्टार प्रचारक व केंद्रीय मंत्री हिमाचलमध्ये तळ ठोकून होते. तरीही भाजपला सत्ता राखता आली नाही.
आपचा फुगा फुटला
दरम्यान, आम आदमी पार्टीने हिमाचल प्रदेशमध्ये देखील चांगल्या विजयाचे दावे गेले होते. मात्र, या पक्षाला हिमाचलमध्ये खातेही उघडता आलेले नाही. अन्य पक्ष व अपक्षांचे तीन उमेदवार निवडून आले. एकूणच हिमाचलमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप लढाईत इतर पक्ष साफ झाले.
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा