मेडिकलचे कॅन्सर इंन्स्टीटयुट व लिनीयर एक्सीलेटर कार्यान्वीत करा

0

 

माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांची मागणी : वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र

नागिपूर. मध्य भारतातील कर्करोगग्रस्तांवर उपचाराचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूर येथील शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (Nagpur Medical) कर्करोग विभागाकडे बघीतले जाते. परंतु, या विभागात सद्या लिनीयर एक्सीलेटर उपलब्ध नसुन ब्रेकी थेरीपी यंत्रही निकामी (Linear Accelerator is not available and brakey therapy machine also failed ) झाले आहे. येथील रुग्णांवर कालबाहय झालेल्या कोबाल्ट यंत्राद्वारेच उपचार सुरु आहे. कर्करोगाचे निदान झाल्यावर उपचार घेणाऱ्या सुमारे ८० टक्के रुग्णांना रेडीयो थेरीपीची गरज भासते. कर्करुग्णांची होणारी हेळसांड व गरज लक्षात घेऊऩ मेडिकलमध्ये कॅन्सर इंन्स्टीटयुट व लिनीयर एक्सीलेटर कार्यान्वीत करा, अशी मागणी माजी मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. यामगणीचे निवेदन त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पाठविले आहे.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय (मेडीकल), नागपूर कँसर इन्स्टिटयूट प्रस्तावीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळातच ही घोषणा झाली होती. परंतु, अद्यापही प्रस्तावीत कँसर इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आले नाही. ते तयार झाल्यास व लिनीयर एक्सीलेटर कार्यान्वीत झाल्यास तसेच या कार्यासाठी लागणाऱ्या आवश्यक यंत्र सामग्रीचा पुरवठा झाल्यास त्याचा जास्तीत जास्त गोर गरीब गरजू रुग्णांना या सुविधेचा लाभ होईल.

करिता शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय (मेडीकल) मध्ये कॅन्सर इंन्स्टीटयुट बनवून लिनीयर एक्सीलेटर तसेच संबंधीत यंत्र सामग्रीचा पुरवठा करुन कार्यान्वीत करण्यात यावे असे विनंतीवजा पत्र माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांना पाठवून माजी पालकमंत्री व उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी मागणी केली आहे.

गरीब रुग्णांसाठी मेडिकल आशेचे किरण ठरले आहे. मध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगढ, आंध्रप्रदेशसह संपूर्ण मध्यभारतातील गरीब रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. त्यांना योग्य उपचार मिळावेत यादृष्टीने उपाययोजन करण्यात यावी अशी जुनी मागणी आहे. नागपूरच्या हक्काचे कॅन्सर यूनीट औरंगाबादमध्ये पळविण्यात आले. त्यामुळे निदान आता येथे कॅन्सरग्रस्तांना सुविधातरी द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.