Home MAHARASHTRA आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सी. पी. अँड बेरार शिक्षण संस्थेला प्रदान

आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार सी. पी. अँड बेरार शिक्षण संस्थेला प्रदान

0

नागपूर | प्रतिनिधी-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार’ सी. पी. अँड बेरार शिक्षण संस्थेला प्रदान करण्यात आला. हा गौरव सोहळा विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात रविवारी दणक्यात पार पडला.
आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार महालमधील सी.पी. अँड बेरार संस्थेचे अध्यक्ष अँड. अशोकराव बनसोड, उपाध्यक्ष भालचंद्र कागभट, सचिव विजय कागभट व प्राचार्य अजय कुलकर्णी यांनी तो स्वीकारला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ इंगोले यांची विशेष उपस्थिती होती.

या सन्मानामुळे सी. पी. अँड बेरार शिक्षण संस्थेच्या कार्याला मोठी पावती मिळाली असून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव व विद्यापीठ प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

सी. पी. अँड बेरार एज्युकेशन सोसायटी ही नागपूरस्थित एक प्रतिष्ठित संस्था असून ती अनेक महाविद्यालयांचे यशस्वी संचालन करते. या संस्थेने केजी ते पीजी उच्च दर्जाचे शिक्षण सर्व अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. आणि समाजसेवेच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.