नागपूर : (nagpur)राहुल गांधी(rahul gandhi) यांच्या समर्थनार्थ (congress)काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष(nana patole) नाना पटोले, माजी मंत्री ऍड(yashomati thakur) यशोमती ठाकूर आदी विदर्भातील अनेक नेते गुजरातमध्ये सुरतला पोहचले आहेत.मात्र, काल महाविकास आघाडीच्या बैठकीत(sambhaji nagar) संभाजीनगरला न गेलेल्या पटोले यांनी आज सुरत गाठल्याने उलट-सुलट सवाल उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे आज नागपुरात(KDK) केडीके महाविद्यालयात सायंकाळी बैठक होत आहे. 16 एप्रिल रोजी नागपुरात मविआच्या नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. या बैठकीत पटोले गैरहजर राहणार का हा प्रश्न आहे. गुजरातला जात असलेल्या दरम्यान, काँग्रेसने आज गुजरातमध्ये शक्तिप्रदर्शन केले. यासंदर्भात बोलताना माजी मंत्री यशोमती ठाकूर चांगल्याच संतापल्या .आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील (shinde gat)शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते. त्यावेळी अशीच चौकशी केली होती का, असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलीसांना केला. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. सुरतला रवाना होत असताना आमदार यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलीसांनी अडवली. त्यावेळी पोलीसांनी लाइव्ह स्ट्रीमींग कॅमेराधारक दोन कर्मचारी यशोमती ठाकूर यांच्यासमोर उभे केले आणि याचं थेट लाइव्ह गांधी नगर मध्ये होतं आहे असे सांगितले.
यावर आमचा नेता गुजरातला आहे, त्यांच्या समर्थनासाठी आम्ही जाऊ शकत नाही का? काय करायचं ते करा, आम्ही घाबरत नाही, असं म्हणत ॲड यशोमती ठाकूर यांनी पोलिसांना विरोध केला त्यानंतर पोलिसांनी यशोमती ठाकूर यांच्या गाडीस जाऊ दिले.
भारतासारख्या देशात जर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यासाठी अशा पद्धतीची अरेरावी होत असेल तर ही एकूणच बाब गंभीर आहे. राज्यातील सत्तांतरासाठी गुजरातने बंडखोर आमदारांना रेड कार्पेट टाकून सुरक्षा दिली आणि आज काँग्रेसच्या आमदारांना प्रतिबंध का केला जात आहे, याचा निषेध ही यशोमती ठाकूर यांनी केला.