टिपागड दलमच्या नक्षलवाद्यास अटक

0

गोंदिया– (gondia) नक्षलवाद्यांसाठी स्फोटके घेऊन जात असलेल्या टिपागड दलमच्या नक्षल सदस्यास (Naxal members of Tipagad Dalam) पोलिसांनी नागनडोह जंगल परिसरात ( forest Nagandoh area ) अटक केली. त्याच्याजवळून स्फोटके जप्त करण्यात आली (Explosives have been seized ) आहे. नक्षलवादी संघटना दरवर्षी जानेवारी ते जुन दरम्यान टिसीओसी (TCOC) कालावधी पाळून या दरम्यान प्रशासनाविरुद्ध बंड पुकारून अवैधरित्या स्फोटके व साहित्य गोळा करून देशविघातक विविध घातपाती घटना, विध्वसंक कृत्य घडवुन जनमाणसात दहशत पसरविण्याचे आणि आपला वर्चस्व दाखविण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे गोंदिया जिल्हयातील नक्षल प्रभावित भागातील क्षेत्रात नक्षल हालचाली संबंधात गोपनीय यंत्रणा सक्रिय करून माओवादी नक्षलवाद्यांना मदत करणारे -सहकार्य करणाऱ्यांची माहिती काढून नक्षल्यांचे दहशतवादी मनसुबे हाणून पाडण्यासाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याच दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

केशोरी (police)पोलिस ठाण्यांतरग्त भरनोली लगतच्या नागनडोह जंगल परिसरात घनदाट जंगलात एक व्यक्ती पोलिसाविरुध्द घातपाती विध्वंसक कारवाई करण्याचे दृष्टीने माओवादी- नक्षलवादी यांना स्फोटके व इतर साहित्य देण्यासाठी जंगल मार्गाने जाणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस पथकाने स्फोटके घेवुन जाणाऱ्या व्यक्तीला जेरबंद करण्यासाठी नागनडोह जंगल परिसरात सापळा रचला होता. घनदाट जंगल परिसरात संशयीतरित्या पाठीवर काळया रंगाची बॅग घेवून जात असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले. बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १ डेटोनेटर, १ जिलेटीनची कांडी असे स्फोटके, साहित्य मिळुन आले.
किसन ऊर्फ क्रिष्णा मुर्रा मडावी, (३१) रा. खारकाडी, पोस्ट- हेटी, ता. धानोरा, जि. गडचिरोली याला अटक करण्यात आली आहे. तो टीपागड दलम सक्रीय सदस्य असून याने सन २००९ मध्ये गडचिरोली पोलीसांविरुद्ध नक्षल वाद्यांनी मरकेगाव, हत्ती गोटा येथे केलेल्या हल्ल्या त सहभागी असल्याचे, तसेच सन २०११ मध्ये खोब्रामेंढा गोळीबार, मुरुमगाव येथील हल्ला, इत्यादी घातपाती हल्ल्यात सहभागी असल्याचे सांगितले आहे.

 

भेलपुरी पापड कोन चाट आणि छोले चॅट रॅप | Bhelpuri Papad Cone Recipe|Chhole Chaat Stuffed Roll |EP-106