वज्रमुठ सभेत अजितदादाना कवडीचाही इंटरेस्ट नाही

0

– संजय शिरसाठ छत्रपती संभाजी नगर -विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मविआचे वज्रमुठ सभेत कवडीचाही इंटरेस्ट नाही असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला.

शिरसाट म्हणाले, सर्वात जास्त त्रास अजित दादांना होत असेल, खुर्ची कालपर्यंत ठेवायची का नाही हा संभ्रम होता. याआधी बनवलेल्या कमिटीमध्ये अजितदादांचे कुठेही नाव नव्हतं. अजित दादांना बोलावलं असे संजय राऊत म्हणत आहेत परंतु ते काय बोलतील हा महत्वाचा प्रश्न राहणार आहे. अजित पवार सभेला शरीराने राहतील मात्र मनाने नाही, खरेतर अजित दादांचा वज्रमुठ सभेत कवडीचाही इंटरेस्ट नाही.अजित पवार मनातून कुठे आहेत हे दोन-चार दिवसात कळेल. अजितदादा सांभाळून पाऊल टाकत आहेत पहिले चुकलेले पाऊल पुन्हा चूक होता कामा नये, हा निर्धार असावा.
अजित पवारांच्या मनामध्ये पुढच्या घडामोडी ठामपणे आहेत.मुळात अजित पवार यांनी घेतलेला निर्णय ते बदलत नाहीत, काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल अजितदादा निर्णय घेतीलच असेही ते म्हणाले.
दुर्दैवाने एकत्रित सर्वांना वज्रमुठ सभा घ्यावी लागतेय.आमची एकजूट आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.

सभा घेऊन जर मत पडत असतील आणि वातावरण बदलत असेल तर हा त्यांचा गैरसमज. चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्याला कवडीची किंमत पक्षात आणि बाहेर नाही.

टॉवरवर चढून मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळाची बैठकीसाठी आंदोलनाचा निर्णय चांगला आहे. 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक व्हायला हवी. आंदोलकांनी केलेली मागणी माझीही आग्रही मागणी असेल. मुख्यमंत्री तातडीने निर्णय घेतील असं मला वाटते.
दरम्यान,भाजप किंवा आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, आम्ही मुस्लिम धर्माच्या विरोधात हा समज चुकीचा असून अनेक मुस्लिम तरुणांना इतर देशातील अतिरेकी भडकवण्याचे काम करतात. लव्ह जिहाद किंवा अतिरेकी करवायांच्या माध्यमातून त्यांचा बळी दिला जातो ते थांबला पाहिजे ही सरकारची भूमिका, पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे.