अजित पवार हे राज्यातले सक्षम नेतृत्व- गिरीश महाजन

0

 

जळगाव – अजित पवारांऐवजी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना मोठी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. मुळात अजित पवार हे राज्यातले एक सक्षम नेतृत्व आहे. ते सरस होते हे सगळ्यांना आणि राज्याला मान्य आहे.अशा परिस्थितीत अजित पवारांना बाजूला सारलं गेलं, त्यांना मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली गेली नाही, पण हा राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत वादाचा किंवा निर्णयाचा भाग आहे त्यात आपण न पडलेलं बरं अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली. शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांचे राजीनामे भाजप घेणार ही चर्चा कोणी सुरू केली हेच मला समजत नाही. प्रसारमाध्यमांनीच ही चर्चा सुरू केली. आठवडाभर मी मुंबईत होतो पण प्रत्यक्षात अशी चर्चा झाल्याची मला माहिती नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांचे राजीनामे घेणार या वावड्या आहेत.या गोष्टीत कुठंलही तथ्य नसून राज्य मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परवाच दिल्लीत होते. मंत्रिमंडळ विस्ताराचा लवकरच मुहूर्त निघणार आहे असा दावा महाजन यांनी केला.