कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ

0

 

मुंबई: कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून आता या ग्रामसेवकांना सोळा हजार रुपये मानधन मिळणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज विविध निर्णय घेण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करता यावी, यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून 1500 कोटी रुपयास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अतिरिक्त न्यायालय व जलद गती न्यायालयांना दोन वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पुण्यात चार अतिरिक्त कुटुंब न्यायालये स्थापन करण्यात येणार आहे. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येणार असून निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.