गोरेवाड्याच्या मोकळ्या आकाशात आकाशदर्शन

0

खगोलप्रेमींची गर्दी

नागपूर. जंगलात भ्रमंती केल्यास वन्यप्राणी जवळून न्याहाळता येतात. पण, आकाशातील ग्रह, ताऱ्यांच्या विश्वाबद्दल कायमच कुतूहल असते. हीच बाब लक्षात घेत शनिवारी रात्री गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या (Gorewada Zoo) वाहनतळ परिसरात आकाशदर्शन (Astro-Night Tourism) उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बच्चेकंपनीने दुर्बिणींच्या मदतीने अवकाशविश्व अनुभवले (Experience the space world with the help of telescopes). जंगलालगतच्या मोकळ्या जागेतून आकाशदर्शन खगोलप्रेमींसाठी पर्वणीच ठरली. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय, रामण विज्ञान केंद्र आणि तारांमंडल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सायंकाळी या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राणिसंग्रहालयाचे संचालक एस. एस. भागवत यांनी सहभागी नागरिक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरवात केली. रामन विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ चारुदत्त पुल्लिवार यांनी उपस्थितांना आकाश दर्शनासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या दुर्बिणी आणि त्यांच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहीती दिली. महेंद्र वाघ आणि आभिमन्यू भेलावे यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रातर्फे सुमित नासरे, तुषार मडके, हरिष देशपांडे, पुष्पम चौरसिया, कालिदास नाकाडे, पवन डोहाळे यांनी आकाश दुर्बिण सहाच्यकाची भुमिका पार पाडली.
भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये खगोल विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी भारतातील विविध शहरात ‘अॅस्ट्रो नाईट टुरिझम’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत विविध पर्यटनस्थळी आकाश दर्शनाचे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. याच शृंखलेत गोरेवाडा येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. सामान्य नागरिकांमधील ग्रह, तारे, नक्षत्र याबद्दलचे गैरसमज दूर करुन खगोल विज्ञानाबाबत वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

चंद्रावरील खळ, मंगळ, शुक्राचे दर्शन

सुमारे 2,000 विद्यार्थी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. वेळेपूर्वीच नागरिकांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले होते. एकूण 6 महाकाय आकाश दुर्बिनींच्या मदतीने आकाशातील ग्रह, ताऱ्यांच्या गर्दीने अवलोकन करता आले. उपस्थितांनी चंद्रावरील खळ, मंगळ, शुक्र, ओरायन नेब्युला या ग्रहांच्या निरीक्षणाचा आनंद लुटला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा