कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये शोककळा
गडचिरोली. सरकारे वनाछ्छादन वाढविण्यासह वनसंवर्धनावर भर देत आहे. वन्यप्राण्यांची संख्या वाढावी यासाठीही उपाययोजना केल्या जात आहेत. त्याल बऱ्याच अंशी यश येतानाही दिसत आहे. जंगलात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहे. म्हणूनच पर्यटकांची पावले जंगलांकडे अधिकाधिक संख्येने वळू लागली आहे (More and more tourists are turning towards the forests). सिरोंचा वनविभागा अंतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्तीकॅम्पला (Govt elephant camp in Kamalapur forest area under Sironcha forest division) भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात हा हत्तीकॅम्प प्रसिद्ध आहे. दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते. मात्र, दुर्लक्षामुळे दरवर्षी येथील हत्तींचा मृत्यू होतो आहे. या कॅम्पमधील मंगला हत्तीणीची प्रसुती झाली. पण, जन्मताच पिल्लाचा मृत्यू झाला. यापूर्वी मंगलाच्या आदित्य, सई, अर्जुन नावाच्या तीन पिलांचा मृत्यू झाला आहे. आता प्रसुती होताच तिने चौथे बाळही जन्मताच दगावले (Mangala lost the fourth disaster) आहे. त्यामुळे वन विभागाच्या कार्यप्रणालीवर पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मानवी हस्तक्षेपामुळे वन व वन्यप्राण्यांची हाणी हा सर्वश्रृत विषय ठरला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागाच्या अंतर्गत येत असलेल्या कमलापूर येथील वनपरिक्षेत्रातील शासकीय हत्ती कॅम्पला देखील हीच बाधा झाली आहे. या कॅम्पमध्ये एकूण आठ हत्ती आहे. त्यातील मंगला हत्तीण गेले काही दिवस गरोदर होती. ही बाब लक्षात आल्यापासून येथील अन्य हत्ती तिची काळजी घेत होते. वन विभागाचे कर्मचारीसुद्धा तिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. नवीन पाहुणा येणार असल्याची चाहूल लागल्याने संर्वत्र आनंदाचे वातावरणही होते. अलीकडेच ती जंगलात निघून गेली होती. नेहमीच्या सवयीनुसार ती प्रसुतीसाठी जंगलात गेल्याचे कर्मचाऱ्यांनाही माहिती होते. यामुळे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीकॅम्प परिसरालगतच्या जंगलात लक्ष केद्रित केले होते. रविवारी तिची जंगलात प्रसूती झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. तिला परत आणण्यासाठी कर्मचारी जंगलात गेले होते. शोधाशोध सुरू असताना हत्तीणीने जन्म दिलेले पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. पण, आता त्याचा काहीच उपयोग नसल्याने सारेच निराश आहेत. सर्वत्र एक प्रकारची शोककळा पसरली आहे. घटनेनंतर हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवल जात आहे.