महानिर्मितीच्या अभियंत्यासह कंत्राटदारावर गुन्हा

0

कामगार संघटनेच्या बनावट पत्राच्या आधारे टाळली कारवाई

नागपूर. शासकीय विभगांमधील घोळ, गैरप्रकार काही नवीन नाही. मात्र, महानिर्मितीत (MAHAGANCO) भलतीच भानगड समोर आली आहे. न्यायालयातही बनवाबनवीचे हे प्रकरण निष्पन्न झाले. न्यायालयाच्या आदेशावरून महानिर्मितीच्या कार्यकारी अभियंत्यासह (Executive Engineer ) एका कंत्राटदारावरही खापरखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Khaparkheda police registered a case ) आहे. त्याचे झाले असे की, राष्ट्रीय मजदूर काँग्रेसकडून (National Mazdoor Congress) कंत्राटी कामगारांच्या पिळवणूकीबाबत एका कंत्राटदारविरोधात प्रशासनाकडे रितसर तक्रार दिली होती. नियमानुसार शासकीय वा निमशासकीय अस्थापनांमध्ये कुणी तक्रार केल्यास त्यावर चौकशी करायची आणि दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, महानिर्मितीच्या खापरखेडा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर, ही तक्रारच परत घेण्यात आल्याचे संघटनेचे बनावट पत्र फाईलमध्ये लावून चौकशी टाळण्यात आली होती. हा गंभीर प्रकार पुढे आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
विश्वास सोमकुंवर आणि भरत पटेल असे गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. सोमकुंबर हे महानिर्मितीचे कार्यकारी अभियंता आसून पटेल कंत्राटदार आहेत. इंटकचे भीमराव बाजनघाटे हे इंटकचे महासचिव आहेत. त्यांनी खापरखेडा प्रकल्पातील काही कंत्राटी कामगारांना ए.बी.यू. कन्स्ट्रक्शनकडून हजेरी कार्ड मिळत नाही, किमान वेतनावरील भत्ते मिळत नाही, कामगारांना वेतन पावती मिळत नाही, ईपीएफ भरला जात नसल्यासह इतरही गंभीर आरोप असलेली तक्रार महानिर्मितीच्या मुख्य अभियंत्यांकडे करीत कामगारांना न्याय देण्याची मागणी केली होती. या तक्रारीवर पुढे काही झाले नसल्याचे बाजनघाटे यांनी महानिर्मितीमध्ये चौकशी केली. त्यावर इंटकने तक्रार परत घेतल्याचे पत्र दिल्याने पुढे काहीच झाले नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी माहितीच्या अधिकारातून महानिर्मितीकडून संबंधित पत्र मिळवले. हे पत्र बनावट असल्याचे पाहता क्षणीच त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी महानिर्मितीच्या मुख्य अभियंत्यांना याबाबत माहिती देत सावनेर न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाच्या निर्णयानंतर खापरखेडा पोलिसांनी बनावट पत्र प्रकरणी महानिर्मितीचे अभियंता सोमकुंवर आणि कंत्राटदार पटेल यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा