चंद्रपूर : माजी मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Congress Leader Vijay Wadettiwar) राज्यातील पक्षाच्या नेत्यांनी संयमाने बोलण्याचा सल्ला दिलाय. आमच्या सगळ्या नेत्यांनी जिभेवर संयम ठेवावा. त्यामुळे आघाडी मजबूत होईल, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President Nana Patole ) यांना दिला. विजय वडेट्टीवार म्हणाले की, लिहिताना, बोलताना भान ठेवावे. भान ठेवून बोलावे. भान ठेवून लिहावे. तोडण्याची भाषा करू नये. जोडण्याची भाषा प्रत्येकाने करावी. महाविकास आघाडीचे भविष्य उज्ज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. वडेट्टीवारांच्या टीकेचा रोख नाना पटोले यांच्यावर असल्याचे समजते. दरम्यान, वडेट्टीवार यांचा बंद खोली निर्णय करु, असा पलटवार नाना पटोले यांनी केला. ते इतके मोठे नेते नाहीत, त्यावर मी इथे बोलले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणातील टीका टिपण्णीवर भाष्य केले. येणारे सरकार महाविकास आघाडीचे असणार आहे. कितना भी जोर लगाले, ये टुटने वाला नही है. थोडे ढिले झाले तरी पुन्हा फेव्हिकॉल लावत जावू. जोडत जावू. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कोणत्याही विरोधकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.