पहिल्या टप्प्यात कळंब पर्यंत धावणार रेल्वे ; खा. रामदास तडस यांनी केली रेल्वे मार्गाची पाहणी

0

वर्धा -वर्धा -नांदेड मार्गावर लवकरच वर्धा ते कळंबपर्यंतचा रेल्वेचा पहिला टप्पा पूर्ण होत आहे. वर्ध्याच्या देवळी आणि भिडी येथे रेल्वे स्थानकाची उभारणी उभारणी होऊन कळंबपर्यंत रेल्वे धावणार आहे. खासदार रामदास तडस यांनी या रेल्वे मार्गाची आज पाहणी केली आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. वर्धा रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. येथे 200 कोटी रुपयांच्या विकासात्मक प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. सुसज्ज असे वर्धा रेल्वे जंक्शन, त्यामध्ये शॉपिंग मॉल आणि महात्मा गांधी यांचा जगाला परिचय व्हावा यासाठी म्युझिअम असल्याचे खासदार रामदास तडस यांनी सांगितले, आज खासदार रामदास तडस यांनी वर्धा रेल्वे स्थानकावर देखील पाहणी केली,यावेळी नागपूर रेल्वे मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.