शपथ घेणारे आमदार वगळता इतर सर्व आमच्यासोबत-जयंत पाटील

0

 

मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेणारे नऊ आमदार वगळता इतर सर्व ४५ आमदार हे आमच्यासोबत आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (NCP State President Jayant Patil) केलाय. अजित पवारांच्या शपथविधीसोहळ्याला राष्ट्रवादीचे जे आमदार उपस्थित होते, ते शरद पवारांसोबत असून त्यांच्यासाठी राष्ट्रवादीचे दरवाजे उघडे आहेत. परत येण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण संधी देणार आहोत व उर्वरित आमदार सोबत येतील अशी अपेक्षा आहे. अन्यथा त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा पाटील यांनी दिला.

अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला जे आमदार गेले होते, ते मनाने गेले नव्हते. सुरुवातीला आपण कशावर सह्या करीत आहोत, हे देखील आमदारांना माहिती नव्हते. त्यांना त्यांची चूक समजली असेल तर त्यांनी परतायला हवे, असेही पाटील म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून विरोधक कमकुवत झाले असल्याचा गैरसमज भाजप पसरवित असल्याचा आरोप करून जयंत पाटील म्हणाले की, हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. भाजपविरोधात विरोधकांना एकजूट करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.