Home Top News लोकधारा आणि देशभक्तीचा अप्रतिम मिलाफ

लोकधारा आणि देशभक्तीचा अप्रतिम मिलाफ

0

‘माटी हमारा वंदन..!!’ मध्ये संगीत-नृत्याचा सुंदर संगम

नागपूर 23 मार्च :
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित व कलासंगम, कला व सांस्कृतिक मंडळ आणि केशवनगर सांस्कृतिक सभा प्रस्‍तुत ‘माटी हमारा वंदन..!!’ हा देशभक्तीपर आणि लोकधारेच्या गीत संगमातून साकारलेला संगीत-नृत्याचा कार्यक्रम चांगलाच रंगला.

‘माटी हमारा वंदन..!!’ हा कार्यक्रम शुक्रवारी शंकरनगर येथील साई सभागृहामध्ये पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे अधिकारी वसंत खडसे व रूपेश गायधणे, जेष्ठ साहित्यिक प्रकाश एदलाबादकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली.

या कार्यक्रमात नागपूरमधील सुमारे २०० प्रसिद्ध गायक, वादक आणि नृत्यनाट्य कलाकार सहभागी होते. देशभक्ती आणि भारतीय लोकसंस्कृतीचा अनोखा आविष्कार रसिकांना अनुभवायला मिळाला. प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गाण्यांनी व नाट्यनृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी गायक अमर कुळकर्णी, मुकुल पांडे, अक्षय चारभाई, अमेय वैद्य, मंजिरी वैद्य, सायली मास्टे, भाग्यश्री बारस्कर, आकांक्षा चारभाई यांनी “हिंदुस्तान की कहानी”, “वंदे मातरम”, “शिवतांडव”, “रामायण”, “यदा यदा हि”, “बुद्धमं शरणमं गच्छामि”, “नमो नमो शंकरा”, “पंजाबी गिद्दा”, “मोती वेराणा”, “म्हारो हेलो”, “चाणक्य”, “हम करे राष्ट्र आराधन”, “दिंडी”, “विठुचा गजर”, “माऊली माऊली”, “रंग दे बसंती चोला”, “आई भवानी”, “लल्लाटी”, “अफझल खानवध पोवाडा”, “ये देश है वीर”, “मंगल मंगल”, “जयोस्तुते”, “डॉ. हेडगेवार”, “जननी जन्मभूमी”, “डॉ. आंबेडकर”, “भारतीय घटनेचा”, “नांदी”, “गाऊ नको रे कृष्णा”, “आमी ठाकर”, “सुनो गौर से”, “शिवराज्यभिषेक”, “अरुणोदय झाला”, “मेरे घर राम”, “मेरे भारत का बच्चा”, “मिले सुर मेरा तुम्हारा”, “माटी हमारा वंदन”, यासारखी गीते सादर केली. यांना सहाय्यक गायक म्हणून सचिन कोल्हारकर, यशवंत रानडे, वेदांत दांडेकर, वरुण व्यवहारे, फाल्गुनी खटी, देविका मार्डीकर, रेणुका कोल्हारकर उत्तमरीत्या साथ दिली. यावेळी वाद्यवृंदावर गोविंद गडीकर, अमर शेंडे, प्रवीण लिहितकर, गौरव टांकसाळे, पंकज यादव, नंदू गोहणे, विशाल दहासहस्त्र, विक्रम जोशी यांनी साथसंगत केली.

नाट्य दिग्दर्शन सारंग मास्टे, अभिषेक बेल्लारवार, दीपाली घोंगे व त्यांच्या चमूने केले, तर नृत्य दिग्दर्शन श्रीकांत धबडगावकर व त्यांच्या चमूने सादर केले.

ध्वनी व्यवस्था संदीप बारस्कर, प्रकाश योजना सुनील बोंबले, नेपथ्य राजेश अमीन, व्हिडिओ व्यवस्थापन मनोज पीदडी यांनी सांभाळले. विशेष सहाय्य आशुतोष अडोणी यांचे होते, तर कार्यक्रमाचे समन्वयक गजानन रानडे होते.

Box ..
आजपासून ‘रामस्मरण व्याख्यानमाला’

‘रामस्मरण व्याख्यानमाला’ 28 ते 30 मार्च 2026 दरम्‍यान सायंकाळी 6.30 वाजता महर्षी व्यास सभागृह, डॉ. हेडगेवार स्मारक परिसर, रेशीमबाग येथे आयोजित करण्‍यात आली आहे.
आज 28 तारखेला सुप्रसिद्ध प्रवचनकार विवेक घळसासी यांचे ‘रामायणातील भेटीगाठी’ विषयावर व्‍याख्‍यान होणार असून अध्‍यक्षस्‍थानी म.न.पा. नागपूरचे सांस्कृतिक व क्रीडा अधिकारी पियूष आंबुलकर राहतील.

29 मार्च रोजी सुप्रसिद्ध अभिनेते व वक्ते शरद पोंक्षे यांचे ‘भारत एक हिंदुराष्‍ट्र’ विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थान स्थायी समिती अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे भूषवतील.

30 मार्च रोजी सुप्रसिद्ध प्रवचनकार श्रीनिवास पेंडसे ‘मृत्‍युंजय छत्रपती’ विषयावर आपले विचार व्‍यक्‍त करतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी राहतील.