Home Top News फोटोग्राफी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानवर झाली सखोल चर्चा

फोटोग्राफी क्षेत्रातील बदलत्या तंत्रज्ञानवर झाली सखोल चर्चा

0

‘फ्रॉम लेन्स टू अल्बम’ टॉक शोला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर, दि. 28 मार्च 2026 :

कॅव्‍होक सर्विसेसच्यावतीने नक्षत्रा बॅन्क्वेट, एम्प्रेस मॉल, नागपूर येथे आयोजित ‘भारत फोटो फेअर 2026’ या भव्य प्रदर्शनीच्या दुसऱ्या दिवशी ‘फ्रॉम लेन्स टू अल्बम : फोटो जर्नालिझम अँड वाईल्ड लाईफ डिझाईन’ या विषयावर विशेष टॉक शो उत्साहात पार पडला. फोटोग्राफी क्षेत्रातील बदलते तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि दृश्य मांडणीचे विविध पैलू या चर्चेत उलगडले.

टॉक शो मध्ये प्रसिद्ध फोटोग्राफर व डिझायनर विवेक रानडे, फोटोजर्नालिस्‍ट अनंत मुळे, वाईल्‍ड लाईफ फोटोग्राफर सरोश लोढी व अल्‍बम डिझायनर के. गणेश यांनी सहभाग नोंदवला.

विवेक रानडे यांनी छायाचित्रामागील कथा प्रभावीपणे मांडण्याची कला, फ्रेमिंग, रंगसंगती आणि अल्बम डिझाईनमधील आधुनिक ट्रेंड यावर मार्गदर्शन केले तर फोटोजर्नालिस्ट अनंत मुळे यांनी बातमीमूल्य असलेल्या क्षणांना कॅमेऱ्यात टिपताना आवश्यक असलेली तत्परता, नैतिकता आणि दृश्य कथनशैलीचे महत्त्व स्पष्ट केले.
वाईल्ड लाईफ फोटोग्राफर सरोश लोढी यांनी वन्यजीव छायाचित्रणातील संयम, योग्य वेळ, नैसर्गिक प्रकाशाचा वापर आणि दुर्मिळ क्षण टिपण्यासाठी लागणारी तांत्रिक तयारी याविषयी अनुभव कथन केले. अल्बम डिझायनर के. गणेश यांनी डिजिटल युगात अल्बम प्रेझेंटेशन, लेआउट डिझाईन, स्टोरी-फ्लो आणि क्लायंट अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या डिझाईन संकल्पनांची माहिती दिली.

तत्पूर्वी, ‘फोटोग्राफी विथ मल्टिपल फ्लॅश’ या विषयावर ज्येष्ठ फोटोग्राफर जयंत पेडणेकर यांनी मल्टिपल लाईट सोर्सेसचा प्रभावी वापर, पोर्ट्रेट आणि इव्हेंट शूटमध्ये फ्लॅश सिंक्रोनायझेशनचे महत्त्व तसेच क्रिएटिव्ह लाईटिंग इफेक्ट्स यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यानंतर ‘न्यू बॉर्न अँड मॅटर्निटी शूट’ या विषयावर फोटोग्राफर अनघा जांभूळकर यांनी बाळ आणि मातृत्वातील भावनिक क्षण नैसर्गिक आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने टिपण्यासाठी आवश्यक असलेली संवेदनशीलता, योग्य अँगल्स, लाईटिंग आणि थीम निवडीवर आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला कॅव्होक सर्विसेसचे संचालक सुमीत जैन, ऑरेंज सिटी फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष महेश काळबांडे, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट गजानन रानडे, फोटोग्राफर असोसिएशन ऑफ नागपूरचे अध्यक्ष आनंद निर्भवणे यांच्यासह
फोटोग्राफी क्षेत्रातील व्यावसायिक, विद्यार्थी आणि हौशी छायाचित्रकार यांची उपस्थिती होती.