
(Mumbai)मुंबई विधानसभेचे विरोधी पक्ष नेते म्हणून (Congress leader Vijay Wadettiwar) काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची आज विधानसभेत घोषणा करण्यात आली. सभागृहांने नव्या विरोधी पक्ष नेत्यांचे अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडाखोरीनंतर अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद सोडून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. विधानसभेत महाविकास आघाडी विरोधी बाकावर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांपैकी काँग्रेसचे संख्याबळ विधानसभेत जास्त असल्याने या रिक्त जागेवर काँग्रेसला संधी देण्यात आली आहे. त्यानुसार बऱ्याच दिवसाच्या मंथनानंतर काँग्रेसने विरोधी पक्ष नेते पदासाठी वडेट्टीवार यांचे नाव फायनल केले व ते (Assembly Speaker Rahul Narvekar)विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कळविण्यात आले. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी आज विधानसभेत वडेट्टीवार यांच्या नावाची विरोधी पक्ष नेते म्हणून अधिकृतरित्या घोषणा केली. यानंतर (Deputy Chief Minister Ajit Pawar)उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हात धरून वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेते पदाच्या आसनावर बसविले. संपूर्ण सभागृहाने नवे विरोधी पक्ष नेत्याचे अभिनंदन केले.