गोंदिया- धारावीच्या मोर्च्यात संपूर्ण महाराष्ट्राचे लोक बोलावलेत. मुळात धारावीचा विकास त्यांना नको आहे.
विकासविरोधी लोकांनी हा मोर्चा काढला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
धारावीची माणसं यात कमी असून बाहेरची बोलावलेली माणसं आहेत. विकासविरोधी ज्या लोकांचं काम आहे, हे महाराष्ट्र बघत आहे. यात नक्कीचं जनता त्यांना उत्तर देईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.















