Home Top News उदय सामंत यांनी अभ्यास करून बोलावं – भास्कर जाधव

उदय सामंत यांनी अभ्यास करून बोलावं – भास्कर जाधव

0

 

भंडारा- उदय सामंत असे बोलू शकत नाही. त्यांनी अभ्यास करून बोलावे, कारण ज्या कामांचे भूमिपूजन सुरू आहे, ती कामे उद्धव ठाकरे सरकार असताना त्या काळातील मंजूर कामे आहेत असा दावा माजी मंत्री भास्कर जाधव यांनी केला.
या कामावर या विश्वासघाती नियमबाह्य सरकारने स्टे दिला होता.
या सर्व कामांना कोर्टातून मी स्टे उठवला आहे. त्यानुसारच काम करीत आहेत, याच्यावर कोणताही काही वाद नाही. याबाबतीत उदय सामंत यांनी चांगला अभ्यास करून बोलावं.
मंडल आयोगाची स्थापना झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस जन्मालाच आले नव्हते. प्रत्येक समाजाला ते खोटे आश्वासन देत आहेत. धनगर समाज, लिंगायत समाज आणि मराठा समाज यांना किती वेळा म्हटलं आमची सत्ता येऊ द्या आम्ही तुम्हाला एका कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो, असे वक्तव्य कित्येकदा देवेंद्र फडणवीस यांनी केले. पण आजपर्यंत दिलं का? 2014 च्या निवडणुकीत आमचं सरकार आलं, तर विदर्भ वेगळा करू त्याशिवाय मी लग्न करणार नाही.मग, लग्न केलं का त्यांनी की ते बिचारे अजून अविवाहित आहेत? असाही सवाल उपस्थित केले
ओबीसी समाजाला सुद्धा कळून चुकलं की, छगन भुजबळ ओबीसींची बाजू घेत आहेत. छगन भुजबळांचा दोष नाही. कारण त्यांना भाजपाच्या एका मोठ्या नेत्यांनी म्हटलं की, तुम्ही सध्या जामिनावर आहात, आक्रमक व्हा, त्यामुळे छगन भुजबळ यांना आक्रमक व्हावं लागले आहे असेही जाधव म्हणाले.