सर्वोत्तम ग्राहकसेवा व पूर्ण वसुली महत्वपूर्ण:रंगारी
नागपूर दि. १६ मे २०२३ ; महावितरणच्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देताना त्यांनी वापरलेल्या वीज बिलाची पूर्ण वसूल करणे महावितरणच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अभियंत्यांनी यादृष्टीने आपले कर्तव्य चोखपणे बजवावे असे निर्देश नागपूर प्रादेशिक विभागाचे संचालक सुहास रंगारी यांनी दिले.
नागपूर व वर्धा जिल्ह्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या विभाग,उपविभाग यांच्या प्रमुखांचा सत्कार प्रादेशिक विभागाचे संचालक सुहास रंगारी यांच्याहस्ते सोमवारी आयोजित बैठकीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते. महावितरणची सध्यस्थिती व भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन अभियंत्यांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे मत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी परिमंडलात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आर्वी विभाग – कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड,गांधीबाग विभाग – कार्यकारी अभियंता राहुल जिवतोडे ,उमरेड विभाग – कार्यकारी अभियंता समीर शेंदरे,कोंढाळी उपविभाग – उपकार्यकारी अभियंता प्रणव कुरेरवार,भिवापूर उपविभाग – उपकार्यकारी अभियंता दामोदर उरकुडे,मौदा उपविभाग – उपकार्यकारी अभियंता प्रफुल्ल वैद्य,कुही उपविभाग – उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र रंधाये,खापरखेडा उपविभाग – उपकार्यकारी अभियंता मंगेश कहाले,लष्करी बाग उपविभाग – अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत टेम्भेकर,मानेवाडा उपविभाग – अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकेश चौधरी,इतवारी उपविभाग – अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर,हिंगणा उपविभाग – उपकार्यकारी अभियंता अभियंता वैभव नाईक,त्रिमूर्ती नगर उपविभाग – अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश नागदेवते,एमआरएस उपविभाग-अतिरिक्त कार्यकारी अभियंता मदन नानोटकर,वर्धा ग्रामीण -१ उपविभाग – उपकार्यकारी अभियंता राजेश खडसे,हिंगणघाट उपविभाग – उपकार्यकारी अभियंता प्रेमकुमार तेलरांधे, पुलगाव उपविभाग – उपकार्यकारी अभियंता रवींद्र सोनकुसरे, आर्वी उपविभाग – उपकार्यकारी अभियंता चंदन गावंडे या अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला.
वर्धा स्थापत्य उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता प्रज्ञा नगराळे, काटोल -सावनेर नागपूर ग्रामीण चाचणी उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता योगेंद्र निचत व बुटीबोरी नागपूर शहर चाचणी स्थापत्य उपविभाग उपकार्यकारी अभियंता सचिन धनविजय यांचाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या सत्कार कार्यक्रमाला महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार,अधीक्षक अभियंते अजय खोब्रागडे, अशोक सावंत,अमित परांजपे,नारायण लोखंडे सहाय्यक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते, प्रामुख्याने उपस्थित होते. या महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार व वरिष्ठ व्यवस्थापक(वित्त व लेखा) अशोक पोइनकर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.