अमरावती. दोन मित्रांमध्ये मैत्रिणीवरून वाद (Argument between two friends) सुरू झाला. वाद विकोपाला पोहोचला आणि एका वीस वर्षीय तरुणाने परिचित असलेल्या मित्राचा नेलकटरमधील चाकूने गळा कापला (friend’s throat was cut with a knife in a nail cutter). बडनेरा ते अमरावती जुन्या बायपास मार्गावर (Badnera to Amravati old bypass route )ही थरारक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. राजापेठ पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. याप्रकरणी गळा कापणाऱ्या तरुणाला राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. तर जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. रूद्रेश ऊर्फ अजय शैलेश दीक्षित (२०) रा. एमआयडीसी परिसर, अमरावती असे जखमी तर हर्ष शर्मा असे चाकू मारणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तुर्त मैत्रिणावरून वाद झाल्याचे आरोपी आणि जखमींकडून कळते आहे. पण, वेगळे कारण असण्याची शक्यताही नाकारता येत नसून पोलिस बारकाईने तपास करीत आहेत.
रूदेश आणि हर्ष हे एकमेकांच्या परिचित असून. या दोघांसह अन्य एक २० वर्षीय तरुणी हे तिघेही आठवीपर्यंत एकाच शाळेत सोबत शिकले आहेत. आता रुद्रेश ‘एचव्हीपीएम’मध्ये अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाला शिकतो आहे तर हर्ष हा बियाणी महाविद्यालयात पदवीच्या अंतिम वर्षाला असून, तरुणी शहरातच एका महाविद्यालयात बीएससी करत आहे. दरम्यान, तरुणी आणि हर्ष एकमेकांचे चांगले मित्र आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून रुद्रेशसुद्धा तरुणीने आपल्याशी मैत्री करावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यामुळे अनेकदा तो तरुणीचा पाठलाग करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही बाब तरुणीने हर्षला सांगितली. त्यामुळे हर्षने यापूर्वी रुद्रेशला समजावले आहे.
याच कारणावरुन हर्ष आणि रुद्रेश यांच्यात यापूर्वी शाब्दिक वाद झाला आहे. दरम्यान आज रुद्रेश तरुणीच्या घराकडे गेला असता त्याच भागात हर्षसुद्धा गेला होता. या दोघांची भेट झाली व त्याच कारणावरुन दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. चर्चेचे रुपांतर वादात झाले. त्यानंतर हर्षने जवळच्या नेलकटरमधील चाकू काढला आणि थेट रुद्रेशच्या गळ्यावर वार केला. हा चाकू फार धारदार नसला तरीही गळा कापल्या गेला. त्यामुळे रुद्रेशचा गळा चिरल्या गेला. याचवेळी त्या ठिकाणाहून जाणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ धाव घेऊन हर्षला ताब्यात घेतले व रुद्रेशला रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी हर्ष शर्माविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.