उच्चशिक्षित तरुणांकडे देशी कट्टा
कट्ट्यातून गोळी झाडल्याने प्रकरण उघडकीस

0


भंडारा. स्वत:जवळ असलेल्या देशी कट्ट्यातून गोळी झाडली गेल्याने (shot was fired from katta) एक जण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी देशी कट्ट्यासह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन मॅगझिन, १२ जिवंत काडतूसं पोलिसांनी जप्त केली (Police seized two magazines, 12 live cartridges ) आहे. जखमीवर भंडाऱ्यातील (Bhandara) एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही आरोपी उच्चशिक्षित आहेत. आशुतोष प्रदीप गेडाम (२५ रा. बेला) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर, विपिन सुधीर रामटेके (२५ रा. बोरगाव) मिथुन आसाराम दहिकर (३२), बोरगाव या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी आणि अटकेतील आरोपी हे मित्र आहेत. मिथुन इंजिनिअरिंग आणि आशुतोष व विपिन हे दोघे एमएस्सी झालेले आहेत.
तिघेही पवनी तालुक्यातील बोरगाव ते खापा जाणाऱ्या मार्गावर उभे असताना आशुतोष गेडाम याच्या जवळील देशी कट्ट्यातून अचानक गोळी चालली. त्यामुळे गोळी त्याच्या पायाला लागल्याने तो स्वतः जखमी झाला. त्याला उपचारासाठी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता प्रकरण समोर आले. उच्चशिक्षित तरुणांना देशी कट्ट्याचे काम काय, त्यांच्याकडे हे शस्त्र आले कुठून, असे एक ना अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत असून पोलिसांचा तपास सुरू आहे. अलिकडे जिल्हाभरात गुन्हेगारीच्या घटना सासत्याने वाढत आहेत. त्यात उच्चशिक्षित तरुणांना घातक शस्त्र सहजतेने उपलब्ध होत असल्याने पालकांची चिंता फारच वाढली आहे.
डॉक्टरला शंका आली आणि बिंग फुटले
देशी कट्ट्यातून गोळी सुटल्याने जखमी झालेल्या आशुतोषला विपिन आणि मिथुन यांनी भंडारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना जखमेबाबत विचारणा केली असता सर्वांनी खोटी माहिती देत पडल्याने दगड लागल्याची माहिती दिली. मात्र, डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस चौकशीत संपूर्ण धक्कादायक घटनाक्रम उघडकीस आला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा