अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे भाजपच्या वतीने मोदींच्या विकास योजनांची माहितीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे,आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे यांच्यासह इतर भाजप नेते उपस्थित होते.मात्र अचानक सुसाट वारा आला त्यामुळे पूर्णपणे हा मंडप खाली कोसळला.या मंडपाखालून नितेश राणे,अनिल बोडे आदी भाजपा नेत्यांना यावेळी सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना टळली.मंडप खाली कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला होता.