अमरावती : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा लोकसभा उमेदवार घोषित

0

अमरावती, 10 जून : अमरावती लोकसभा मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचे १९५२ पासून वर्चस्व राहिले असून विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती पक्षाने लढविल्या व जिंकल्या. आंबेडकरी जनतेचे प्राबल्य असल्याने अमरावती लोकसभेचा उमेदवार निवडून येण्याची संधी आहे. त्या संधीचं सोनं करण्याकरिता अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद तायडे यांना पक्ष लोकसभेची उमेदवारी देणार असून त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तन,मन धनाने मतदारसंघात कार्यरत राहणार असल्याची माहिती अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांनी पत्रपरिषदेत दिली. अमरावती लोकसभा मतदारसंघ एस सी राखीव असूनसुद्धा खऱ्या एस सी ला प्रतिनिधित्व मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्ये अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विजयी होईल या दिशेने कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून आल्यास आंबेडकरी जनतेवर होणारे अन्याय अत्याचार रोखल्या जातील. तेव्हा कार्यकर्त्यांनी मिलिंद तायडे यांना निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याची माहिती कॅप्टन कुणाल गायकवाड यांनी दिली.