अमृतसर, 10 जून (हि.स.) : सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी (बीएसएफ) पंजाबच्या अमृतसरजवळ पाकिस्तानचे ड्रोन पाडले. अमृतसर जिल्ह्यातील राय गावाजवळ केलेल्या झडतीदरम्यान या क्रॅश झालेल्या ड्रोनमधून संशयित हेरॉईनचे 1 मोठे पॅकेट सापडले आहे. ज्याचे एकूण वजन अंदाजे 5.5 किलो आहे.
बीएसएफच्या जवानांनी ड्रोनचा आवाज ऐकला आणि आवाजाला लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. संपूर्ण परिसराला वेढा घातला. दरम्यान, पंजाब पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान त्यांना खराब झालेले ड्रोन तेथे पडलेले दिसले. झडतीदरम्यान गावात हेरॉईनही सापडले आहे.