पुणे : मॉन्सूनची आगेकूच सुरूच असून येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आज कर्नाटक मध्ये दाखल झाला असून तो आता महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करीत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. मान्सूनने आज कर्नाटकचा काही भाग व्यापला आहे. तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील 48 तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता आहे. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकला. असल्यामुळे मान्सून केरळमधून पुढे सरकलाय. नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर उशिराने मान्सून केरळमध्ये उशीराने दाखल झाला.