बुलढाणा – खामगाव तालुक्यातील दधम येथे रात्री हिवरखेड पोलिसांनी सर्च ऑपरेशन दरम्यान एका घरातून पिवळ्या धातूच्या गिंन्या, तलवार व 3 मोटार सायकल, चाकू लॅपटॉप इतर साहित्यासह 1 लाख 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेषराव रावजी चव्हाण 55 व दिलीप शेषराव चव्हाण 32 रा दधम यांच्या राहत्या घरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेण्याच्या कारणाने सर्च वॉरंट प्राप्त करून त्याच्या घराची झडती घेतली. यात दोघांच्या घरातून पिवळ्या धातूच्या एकूण 700 नग गिंन्या, तलवार व 3 मोटार सायकल इतर साहित्यासह 1 लाख 86 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी हे काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशाने मुद्देमाल बाळगताना आढळून आले. यावरून हिवरखेड पोलिसात ना पो क गजानन दामोदर आहेर यांच्या फिर्यादीवरून शेषराव रावजी चव्हाण 55 वर्षे, दिलीप शेषराव चव्हाण 32 रा. दधम या बापलेकांविरूध्द शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोघे फरार झाले असून पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.