निवडणूक प्रचारादरम्याबन अपक्ष उमेदवारावर हल्ला

0
निवडणूक

अमरावती पदवीधर निवडणूक ; पाठिंब्यासाठी मारहाण केल्याचा आरोप
अमरावती. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या‍निमित्ताने (Graduate Constituency Elections) प्रचाराला वेग आला आहे. प्रत्येकच उमेदवार आप-आपल्या पद्धतीने प्रचार करीत आहेत. प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार विकेश गोकुलराव गवाले (३१) यांच्या वर हल्ला करण्यात (attack on Independent candidate Vikesh Gawale ) आल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. पाठिंबा देण्याaची मागणीकरीत त्यांच्यासोबत वाद घालण्यात आला. याच कारणावरून त्यांच्यावर हल्लाही करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. सोमवारी प्रचारासाठी मोर्शीकडे जात असताना माहुली जहागीरनजीक (माहुली जहागीरनजीक) त्यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला चढवला. यामध्ये विकेश गवाले किरकोळ जखमी झाले आहेत. विकेश गवाले यांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत वाहनाने माहुली जहागीर गाठले. तेथील काही नागरिकांनी त्यांना लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या घटनेनंतर त्यां च्यान नातेवाईकांनी रुग्णालयावर धडक देत घटनेचा निषेध केला. विकेश यांना मारहाण करणारे नेमके कोण होते, हे कळू शकले नाही.
विकेश गवाले हे अमरावती(Amravati) येथील खासगी बँकेत नोकरीला आहेत. रहाटगाव येथील वृंदावन अपार्टमेंट येथे ते वास्तव्यास आहेत. अमरावती पदवीधर निवडणुकीमध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. सोमवारी दुपारी ते चारचाकी वाहनाने मोर्शी येथे प्रचारासाठी जात होते. यावेळी त्यांना माहुली जहागीरपुढे रेल्वे पुलाजवळ चार अज्ञात इसमांनी हात दाखवून वाहन थांबवले. यावेळी पाठिंबा देण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यातील एकाने विकेश गवाले यांना मारहाण करायला सुरुवात केली.
गवाले यांनी तातडीने वाहन सुरू करून घटनास्थळावरून पळ काढला. जीव वाचवत वाहन माहुलीच्या दिशेने वळवले. माहुलीच्या बस थांब्यारवर येताच त्यांनी नागरिकांना घटनाक्रम सांगितला. नागरिकांनी लगेच त्यांना माहुली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती माहुली जहागीर पोलिसांना देण्यात आली, मात्र पोलीस तासभर घटनास्थळी तसेच रुग्णालयात पोहचले नसल्याने नातेवाईकांनी पोलिस स्टेशन गाठून लेखी तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा