फुट पाडण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत

0

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा, एकात्मतेचा नारा पुन्हा केला बुलंद

दिल्ली. देशात एकमेकांत मतभेद आणि फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, आपण सर्वांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, या शब्दात प्रतिक्रिया वजा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांनी दिला आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने (BBC) अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात (Gujarat) दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटातून गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावरून देशात बराच गदारोळ सुरु आहे. तर, केंद्र सरकारने या माहितीपटावर बंदी घालती आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोंदविलेली प्रतिक्रिया महत्त्वाची ठरली असून फुटीचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी तो सूचक इशाराच असल्याचे मानले जात आहे.
दिल्लीतील कॅन्टोन्मेंटमधील करिअप्पा मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या तरुणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान म्हणाले, भारतमातेच्या मुलांमध्ये फूट पाडण्यासाठी अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत. पण, देशातील लोकांमध्ये कधीही मतभेद होणार नाहीत. यासाठी एकता हाच अंतिम पर्याय आहे. एकता हीच भारताची ताकद असल्याचेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?
‘बीबीसी’ने २००२ च्या गुजरात दंगली आणि पंतप्रधान मोदी यांच्या गुजरात दंगलीच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी दोन भागांमध्ये माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रसारित केली. हा माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर यावर आक्षेप घेण्यात आला असून हा व्हिडीओ निवडक प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला. हा माहितीपट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील ‘प्रोपगंडा’ असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.

डॉक्युमेंट्रीच्या स्क्रिनींगवरून वादंग
बीबीसीच्या मोदींवरील वादग्रस्त डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगवरून जेएनयू, जामिया आणि दिल्ली विद्यापीठात गदारोळ झाल्यानंतर या वादाचे लोण महाराष्ट्रातही पसरले आहे. प्रशासनाने डॉक्युमेंट्री दाखवण्यास नकार दिला आहे. त्याचवेळी ही डॉक्युमेंट्री बघण्यावर काही विद्यर्थी संघटना आग्रही आहेत, तर भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते आहे.

 

 

 

 

फेनल अँड पेपर चिकन आणि चिकन टिक्का| EP.NO,78 | Pepper chicken recipe | chicken tikka recipe |

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा