राज्यस्तरीय आदर्श साहित्य सेवक भाषा गौरव पुरस्काराने सन्मानित

0

तरुणाई फाउंडेशन,कुटासा तिसरे मराठी साहित्य संमेलन अकोला

रविवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजी स्व.डाॅ.ज.पा.खोडके साहित्य नगरी वसंत सभागृह शिवाजी महाविद्यालय अकोला येथे
अखिल भारतीय साहित्य महामंडळ, तथा संचालक.प्रभात किड्स मा.डाॅ.गजानन नारे, संजीवनीकार ज्येष्ठ साहित्यिक मा.तुळशीराम बोबडे,
ज्येष्ठ साहित्यिक मा.नारायणराव अंधारे तसेच विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

मा.प्रा.डाॅ. संजय पोहरे अकोला यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ ते ५ गझल,मुशायरा
५ ते ६ पुरस्कार वितरण प्रमुख अतिथी
मा.तुळशीराम बोबडे ,मा.प्रा.डाॅ.मोहन खडसे, मा.प्रा.निलेश जळमकर( सिनेदिग्दर्शक ,सोनी टीव्ही,)
(महाराष्ट्र हास्यजत्रा फेम ) मा.कुणाल मेश्राम,मा.कपिल ढोके या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मा. संगीता आढाऊ यांच्या हस्ते हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला…

सुत्रसंचालन मा.श्री.संदीप देशमुख आणि आभार श्री.धीरज चावरे
सायंकाळी ७-०० वाजता मा. श्री.सुरेश पाचकवडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले.
तरुणाई फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप देशमुख यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाची अतिशय उत्साहात सांगता झाली.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा