नागपूर : महिलांच्या थकित वेतनाच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील धरमपेठ निवासस्थानापुढे हनुमान चालीसा पठण करण्यास जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आज दुपारी शहर पोलिसांनी रोखल्याने संविधान चौकात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आम्ही शांततापूर्ण पद्धतीने हे आंदोलन करीत असताना पोलिसांनी आम्हाला रोखले, ही दडपशाही नाही तर काय? आम्ही पाकिस्तानात जाऊन हनुमान चालीसा पाठ करायचा का ? असा संताप कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. विभागीय आयुक्त यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले उद्या मंगळवारी वर्धा येथे या प्रश्नावर बैठक घेतली जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलक शांत झाले. युवा परिवर्तन की आवाज वर्धा जिल्हाध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात गेले काही दिवस महिलांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान वर्धा प्रभाग संघ व्यवस्थापक महिलांच्या थकीत वेतन मागणीसाठी संविधान चौकात नागपुरातील संविधान चौकात हे आंदोलन सुरू आहे. आश्वासन दिल्यानुसार बैठकीत समाधान न झाल्याने न झाल्यास छुप्या मार्गाने नागपूरचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.