बी. जी.जाधव यांचा उद्या अमृतमहोत्सवी सत्कार

0

 

नागपूर -राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता (विद्युत) बी. जी.जाधव यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांनी केलेल्या कार्य आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून महानुभाव पंथीय तसेच आप्तेष्ट, स्नेही, मित्र परिवारांनी त्यांच्या अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे शनिवारी 24 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता वनामती, धरमपेठ येथे आयोजन केले आहे. या सोहळ्यास अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत विद्वांसबाबा शास्त्री, महंत कारंजेकर बाबा, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
बी.जी.जाधव यांना महानुभाव संप्रदायाचा वारसा लाभला असून ११ (मराठी-इंग्रजी) ग्रंथांचे लेखन केले आहे. यावेळी त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणारा ‘कर्मयोगी’ नावाचा गौरवग्रंथ प्रकाशित होत आहे. सोबतच बी.जी. जाधव लिखित श्रीचक्रधर एव श्रीकृष्ण या ग्रंथाचेही प्रकाशन होत आहे. या सत्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कार समितीच्या अध्यक्ष केशरताई मेश्राम,हेमंत पाटील, लालचंद वंजारी, डॉ. कोमल ठाकरे, चक्रपाणी कवीश्वर, राजकुमार शेंडे, भारतभूषणशास्त्री यांनी केले आहे.