छगन भुजबळांनाही हवी प्रदेशाध्यक्ष पदावर संधी

0

मुंबई-विरोधीी पक्ष नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची आणि पक्ष संघटनेत जबाबदारी देण्याची जाहीर मागणी केलेली असताना आता या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील उतरले आहेत. मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी द्या, अशी मागणी भुजबळांनी केली आहे. भुजबळांच्या मागणीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील गुंता अधिकच वाढला असून या पदावर कोणाला संधी द्यावी, असा पेच पक्षापुढे निर्माण होणार आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, अजूनही आपल्या या देशात समजा-समाजांचे राजकारण चालत आहे. यामध्ये ओबीसी समाज असेल, दलित समाज असेल अथवा मुस्लीम समाज असेल. या सर्व समाजांना पक्षाने बरोबर घेतले पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ शकतो. मराठा तर आमचा मोठा भाऊ आहे. पण एखादे दुसरे पद लहान समाजातील नेत्याला द्या. आम्ही आपल्याबरोबर आहोतच, आम्ही पक्षाचा प्रचार करू. आपली प्रतीमा थोडीशी बदलायला हवी, अशी माझी अपेक्षा आहे. अर्थात पवार साहेब आणि इतर सगळ्या नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे. अजितदादांनी इच्छा व्यक्त केली, तसे मी माझे मत माडले असल्याचे भुजबळ म्हणाले.