“ही तर परिवार बैठक”, फडणवीस यांचा विरोधकांना टोला

0

पाटणा- बिहारची राजधानी पाटणा येथे सुरु असलेली विरोधकांची बैठक ही मोदी हटव बैठक नसून ती परिवार बैठक आहे. आपल्याच कुटुंबाचे वर्चस्व कसे राहील, यासाठी हे नेते एकत्र आलेले आहेत, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या (DCM Devendra Fadnavis on Opposition unity meeting) बैठकीचा समाचार घेतला.
फडणवीस म्हणाले, राजकारण हा त्यांच्यासाठी हा धंदा आहे. आमच्यासाठी ही जनसेवा आहे. येणाऱ्या निवडणुकीतही जनता आम्हाला कौल देईल. आम्हाला मेहबुबा मफ्तीची उदाहरण दिली जात होती. आज उद्धव ठाकरे त्यांच्याच बाजूला जाऊन बसले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
नेत्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी बैठक-बावनकुळे
विरोधकांच्या बैठकीच्या निमित्ताने नेते मंडळी त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी एकत्र आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बावनकुळे म्हणाले की, सोनिया गांधी यांना राहुल गांधींना पंतप्रधान करायचे आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांची चिंता आहे. तर उद्धव ठाकरे यांना आदित्यची चिंता आहे म्हणून ते एकत्र आले आहेत, असे बावनकुळे म्हणाले.