अमरावतीत बच्चू कडू यांच्या प्रहार कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा

0

अमरावती – शिंदे -फडणवीस सरकारने सुरुवातीला दिव्यांग मंत्रालय स्थापन केले तर काल मंत्रालय स्तरावर दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करीत दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबवण्यासाठी आमदार बच्चू कडू यांची राज्य समितीच्या अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक पदी निवड नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाचा दर्जा बहाल केला आहे. अमरावती शहरात आ बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून व अपंग बांधवांकडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडत मिठाई व पेढे भरवत आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी खऱ्या अर्थाने आम्हाला आता न्याय मिळाला व अपंग बांधवांच्या अशा अपेक्षा बच्चू कडू पूर्ण करतील अशा प्रतिक्रिया यावेळी अपंग बांधवांनी दिल्या.