कळमना मार्केटमध्ये आंब्यांची आवक घटली, दरांमध्ये वाढ

0

 

नागपूर – भारतात आंबा हे सर्वात लोकप्रिय फळ आहे. फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या आंब्याची जगात ख्याती आहे. वर्षभर लोक आंब्यांची वाट बघत असतात. नागपुरातील कळमना मार्केट सध्या आंब्यांच्या ढिगांनी सजलेले आहे. यंदा अवकाळी पावसामुळे आंब्यांवर मंगु रोग आल्यामुळे या आंब्यांचे दर घसरले आहेत. ५० ते ६० रुपये विकला जाणारा आंबा आता फक्त ३० ते ४० रुपयांच्या दरात कळमना मार्केटमधून फळविक्रेत्यांना विकला जात आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांपर्यंत हा आंबा आता ५० ते ६० रुपये किलोच्या दराने पोहोचत आहे. नागपुरात हे आंबे मोठया प्रमाणात तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकवरून येत आहेत. नागपूरच्या कळमना मार्कटमधून या आंब्यांची उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , ओडिशा, छत्तीसगड आणि नेपाळसह विविध राज्यांमध्ये विक्री होत आहे. एका गाडीत किमान ५ ते १० टन अशाप्रकारे किमान 150 ट्र्क आंबा दररोज कळमना मार्केट मध्ये उतरवला जात आहे.