कोणावर अवलंबून न राहता आत्मनिर्भर बना

0

अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी : पदार्थ विज्ञान विभागात समर स्कूलचा शुभारंभ

नागपूर. संशोधन करीत असताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे संशोधक म्हणून तुम्हाला सर्व बाबींची माहिती असायला हवी. न येणाऱ्या गोष्टी शिकून घेत कोणावरही अवलंबून न राहता आत्मनिर्भर होण्याचे आवाहन (Become self-reliant without depending on anyone) विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता‌ डॉ. प्रशांत माहेश्वरी (Dean of Science and Technology department Dr. Prashant Maheshwari) यांनी केले. विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने ‘बेसिक मटेरियल कॅरेक्टेरायझेशन टेक्निक्स अँड डाटा इंटरप्रिटेशन टूल्स’ या विषयावर ‘समर स्कूल’चे (Summer School) आयोजन केले आहे. सोमवारी या समर स्कूलचे समारंभपूर्वक उद्घाटन झाले. या सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. ओ.पी. चिमणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विज्ञान व तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. कमलसिंह, आयक्युएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, समर स्कूल समन्वयक डॉ. श्रद्धा शिरभाते यांची यावेळी उपस्थिती होती.

डॉ. माहेश्वरी यांनी अधिकाधिक ज्ञान अर्जित करतानाच इतरांना देखील ते शिकवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. डेटा सायन्स आणि डेटा अनालिसिस टूल अत्यंत महत्त्वपूर्ण असून याचे ऑनलाइन कोर्सेस स्वयंवर उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवाय पारंपारिक अभ्यासक्रमांशिवाय ९ क्षेत्रामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहे. त्यातील एक डाटा सायन्स, इंटेलिजन्स आर्टिफिशियल हे देखील असल्याचे ते म्हणाले.
डॉ. कमल सिंह यांनी पदार्थ विज्ञान विषयातील डायइलेक्ट्रिक, फेरो इलेक्ट्रिक, एक्स-रे, स्पेक्ट्रोस्कॉपी, मॅग्नेटिक स्पेक्ट्रोस्कॉपी आदींविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. या क्षेत्रात अनेक संशोधन झाले असले तरी अद्यापही संशोधनाच्या बऱ्याच शक्यता असल्याचे त्या म्हणाल्या. साधने, उपकरणांची कमतरता असताना देखील विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागातून अनेक संशोधक निघाले आहेत. अनेकांनी पेटंट मिळविले आहे. त्यातील एक डॉ. स्मिता आचार्य असल्याचे त्या म्हणाल्या. सद्यस्थितीत विभागाकडे अत्याधुनिक संशोधक उपकरणे उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. मात्र, कठीण वाटत असलेल्या क्षेत्रातच संशोधन करावे असे आवाहन डॉ. कमलसिंह यांनी केले. उद्घाटनिय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. ओ.पी. चिमणकर यांनी दोन भागांमध्ये समर स्कूलचे आयोजन असल्याचे सांगितले. समर स्कूल चे उद्घाटन झाल्याचे त्यांनी घोषित केले. विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर प्रास्ताविक आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अर्शिया अली यांनी केले तर आभार समन्वयक डॉ. श्रद्धा शिरभाते यांनी मानले. कार्यक्रमाला विविध भागातील विद्यार्थी उपस्थित होते.

६ दिवस मार्गदर्शन

पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने आयोजित ६ दिवसीय समर स्कूलमध्ये विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये क्रिस्टेलोग्रफी, क्रिस्टल सिमेट्री, इंट्रोडक्शन टू रिटवेल्ड रेफिनिमेंट अँड इट्स रोल इन स्ट्रक्चरल एनालिसिस, बेसिक्स ऑफ इंपेंडन्स स्पेक्ट्रोस्कॉपी, हॅन्डलिंग ऑफ इंपेंडन्स अनालायझर, रमण स्पेट्रोस्कोपी, रमण स्पेक्ट्रल फिटिंग अँड रिलेटेड एनालिसिस, फंडामेंटल ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन युज फोर डायइलेक्ट्रिकल्स अँड फरोइलेक्ट्रिक कॅरेक्टरायझेशन, एक्सपरिमेंटल ट्रेनिंग ऑन एलसीआर मीटर अँड पी. ई. लुक ट्रेसर आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.