महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांचे कोयला रोको आंदोलन

0

विदर्भातील खासदारांना गावबंदी : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा इशारा

नागपूर. राज्यभरात 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार असला तरी हाच दिवस विदर्भवाद्यांकडून काळा दिवस पाळला जातो. यावर्षी 1 मेला उमरेड जवळील वेकोलिच्या कोळसा खाणीसमोरील रस्त्यावर कोयला रोको आंदोलन करण्यात येणार (Stop coal movement of Vidarbhavadi on Maharashtra Day) आहे. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील सर्व खासदरांना गावबंदी (Village ban on all Khasdars in Vidarbha including Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) घालण्याचा निर्णयही विदर्भवाद्यांनी घेतला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (Vidarbha rajya Andolan Committee) कोअर कमेटी बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. आंदोलनाची व्यापकता वाढावी यादृष्टीने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर माहविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जाईल. यंदाचा लढा शासनाला इशारा आणि निकरीचा लढा ठरणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीने म्हटले आहे. हे आंदोलन एकप्रकारे विदर्भातील खासदरांसाठी इशाराच ठरणार आहे.

महाराष्ट्र दिनी करण्यात येणाऱ्या निषेध आंदोलनाची रुपरेषा कोअर कमिटीच्या बैठकित निश्चित करणयात आली आहे. त्यानुसार मिशन 2023 अंतर्गत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा निर्धार करीत नुकतीच विदर्भ निर्माण यात्रा काढण्यात आली होती. यात्रेदरम्यान सुटलेल्या तालुकास्थळी किमान 1 जाहीर सभा आंदोलनाची तयारी म्हणून घेण्यात येणार आहे. सोबतच प्रत्येक तालुकास्तरावर विदर्भ निर्माण यात्रा गावोगाव काढली जाणार आहे. संपूर्ण तालुक्यांच्या तालुका यात्रा संपल्यानंतर 1 जाहीर सभा जिल्हा मुख्यालयी घेण्यात येईल. विदर्भ राज्याचा युवा जागर करणारे व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह जिल्ह्यातील खासदारांना तसेच जिल्ह्यात येणाऱ्या सर्व केंद्रीय मंत्र्यांना गावबंदी करून विदर्भाचे राज्य केव्हा देणार, हा प्रश्न विचारला जाणार आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव जे खासदार संसदेत व त्यांच्या पक्षाच्या अजेंडामध्ये घेणार नाहीत त्यांना विदर्भातील जनतेने मतदान करू नये, याबाबतही जनतेत जाऊन आग्रह धरला जाणार आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ऍड. वामनराव चटप यांनी सांगितले की, विदर्भाच्या जनतेला 31 डिसेंबर 2023 पर्यंत विदर्भाचे स्वतंत्र राज्य मिळवून देण्याचे वचन दिले आहे, हे आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे त्यासाठी आम्हाला प्राण पणाला लावून लढायचे आहे, आजपर्यंत 220 च्या वर आंदोलने केली परंतु, ज्यांनी विदर्भाचे स्वतंत्र राज्य देऊ अशी कबुली दिली, आज ते मुंग गिळून बसले आहे. येणाऱ्या निवडणुकीत त्यांना हद्दपार करणार असल्याचा निर्धार व्यक्त करीत तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला विदर्भाचे स्वतंत्र राज्य देऊ अशी घोषणा त्यांनी बुलंद केली.

 

 

 

 

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा