कुठलीही करवाढ नसलेले मनपाचे 3267 कोटींचे बिग बजेट

0

नागपूर :महानगरपालिकेचे सन 2023- 2024 चे सुधारित 3267 कोटीचे अंदाजपत्रक आज सादर करण्यात आले. नागपूर मनपाचे आजवरचे हे सर्वाधिक मोठे बजेट मानले जाते. विशेष म्हणजे यात मालमत्ता करासह कुठलीही नवी करवाढ झालेली नाही. आगामी मनपा निवडणुक डोळ्यापुढे ठेवून यात करवाढ टाळल्यायाचे प्रकर्षाने जाणवते. मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी यांनी आज हे अंदाजपत्रक सादर केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असून महानगरपालिकेने विविध योजनांच्या दिलेल्या सवलतींचा तसेच वेळेत मालमत्ता कर व इतर करांचा भरणा करीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन या निमित्ताने आयुक्तांनी केले. दरम्यान, नागरिकांच्या 97 प्रकारच्या सूचना, मागाण्यांचा अंतर्भाव या अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती राधाकृष्णन यांनी माध्यमांशी बोलताना दिली

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा