गझदर लीग क्रिकेट विक्रम बत्राच्या सर्वाधिक 82 धावा, सहा चौकार

0

नागपूर: विदर्भ क्रिकेट असोसिएशन तर्फे आजपासून सुरू झालेल्या गझदर लीग क्रिकेट सी डिव्हिजन स्पर्धेत विक्रम बत्रा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आज शुक्रवारी गुरुनानक फार्मसी कॉलेज ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात विक्रमने 97 चेंडूत 82 धावा केल्या. यात त्याचे सहा चौकार आहेत. 208 मिनिटांच्या खेळीत 84.54 धावांच्या सरासरीने त्याने ही तडाखेबंद फलंदाजी करीत सर्वांचे लक्ष वेधले. रॉयल क्रिकेट असोसिएशन विरुद्ध रुबी स्पोर्टिंग क्लब असा हा क्रिकेटचा सामना रंगला. मर्यादित 50 षटकांच्या या सामन्यात 47.3 षटकांमध्ये रॉयल क्रिकेट असोसिएशनने सर्व बाद 273 धावा केल्या.या धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात रुबी स्पोर्टिंग क्लब ने 36.1 षटकात सर्व बाद 148 धावा केल्या. अशाप्रकारे रॉयल क्रिकेट असोसिएशन ने बाजी मारली. यात सर्वाधिक धावांचे योगदान देणारा फलंदाज विक्रम बत्रा लक्षवेधी ठरला.