अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयानं आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 2013 सालच्या या प्रकरणात आज सकाळीच कोर्टात त्यांच्यावर आरोप सिद्ध झाले होते.
शिल्पी आणि शरतचंद्र यांना 20 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे.
ज्या छिंदवाडाच्या आश्रमात बलात्काराचं प्रकरण घडलं त्या आश्रमाचे शरतचंद्र हे संचालक होते. तर शिल्पी वॉर्डन होत्या.
तर प्रकाश आणि शिवा यांची कोर्टानं सुटका केली आहे. घटना घडली तेव्हा प्रकाश आश्रमाचे आचारी होते, त्याचवेळी शिवा हे आसाराम यांचे स्वीय सहाय्यक होते.
सूरतमधील एका तरुणीवर 2013 मध्ये बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर लावण्यात आला होता. तर, या पीडित तरुणीच्या बहिणीवर आसारामचा मुलगा साई नारायण याने बलात्कार केला असल्याचा आरोप होता. या प्रकरणात आसारामशिवाय, त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा असे आरोपी आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आसाराम बापूला कोर्टात व्हर्च्युअली हजर करण्यात आले. सुनावणीनंतर कोर्टाने आसारामला दोषी असल्याचे जाहीर केले. मात्र, शिक्षा आज, मंगळवारी सुनावणार असल्याचे सांगण्यात आले.
सूरत बलात्कार प्रकरणात आसाराम बापूच्या पत्नीसह इतर सहा आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार, आसाराम बापूने 2001 ते 2006 दरम्यान पीडितेवर खूपदा अत्याचार केला होता. ही पीडिता शहराबाहेरील एका आश्रमात वास्तव्यास होती.
देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारती सांभाळत आहे. आसारामच्या अटकेननंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.
कोण आहे आसाराम बापू?
आसाराम बापूचं खरं नाव असुमल हरपलानी असं असून 1941 मध्ये सिंध प्रांतातल्या बेरानी गावात त्याचा जन्म झाला. 1947 च्या फाळणीत असुमल हरपलानी याचं कुटुंब भारतात अहमदाबाद शहरात स्थायिक झालं. पुढे 60 च्या दशकात आसारामने लीला शाह यांना आपलं अध्यात्मिक गुरु मामलं आणि लीला शाह यांनीच अमुमलचं नाव आसाराम असं ठेवलं.
त्यानंतर आसारामने अहमदाबादपासून 10 किलोमीटर दूर असलेल्या साबरमती नदीच्या किनारी आपला पहिला आश्रम सुरु केला. इथूनच त्याच्या अध्यात्मिक कारकिर्दीला सुरुवात झाली. पुढे देशातल्या अनेक राज्यात त्याच्या भक्तांमध्ये वाढ होत गेली. आसारामच्या अधिकृत वेबसाईटनुसार जगभरात त्यांचे 40 लाख अनुयायी आहेत. आसारामने आपला मुलगा नारायण साई याच्यासह देश-विदेशात 400 आश्रमांचं जाळं उभारलं.