वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली, तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

0

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोहगाव झिल्पी तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. सुमारे पंधरा-वीस मुले मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी या तलावाच्या काठावर रविवारी सायंकाळच्या सुमारास एकत्रित झाली होती. यापैकी एकाचा पाय धुण्यासाठी पाण्यात उतरला असता खोल गाळात बुडून मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज अग्निशमन दलाच्या मदतीने त्याचा मृतदेह बोटच्या साह्याने पोलिसांनी बाहेर काढला. आशिष दिगंबर मरडे असे मृतकाचे नाव असून तो मूळचा भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे.सध्या तो खापरी पुनर्वसन कॉलनीत वास्तव्याला होता. ॲमेझॉन कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून आशीष कामाला असल्याची माहिती यावेळी मिळाली. अनेक वर्षात सातत्याने या मोहगाव झिलपी तलावात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. खबरदारी म्हणून 26 जानेवारीच्या दिवशी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या ठिकाणी धोकादायक असल्याचा फलक लावण्यात आल्यानंतरही युवक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि खोल पाण्यात उतरतात यातून अशा घटना वारंवार पहायला मिळत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. आशिषचे सहकारी कोण होते याचा मागोवा घेत यासह पोलिस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा