शिक्षक मतदारांचा उत्साह अन मतदानासाठी रांगा!

0

नागपूर, दि. ३० – विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानाला शांततेत सुरुवात झाली असून मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचे आज पहायला मिळाले. आज सकाळपासूनच नागपूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा पहायला मिळाल्या.
विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 43 मतदान केंद्रांवर मतदान होत असून 16 हजार 480 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत सुरू असल्याचे पहायला मिळाले. यात सिव्हिल लाईन्स येथील तहसील कार्यालय (ग्रामीण), म. न. पा. हिंदी प्राथमिक शाळा गांधीनगर आणि हिंगणा येथील पंचायत समिती कार्यालयातील मतदान केंद्रांवर मतदारांची सकाळी गर्दी झालेली पहायला मिळाली. शिक्षक मतदारांचा उत्साह मतदानासाठी दिसून आला.
मतदानाला सकाळी आठ वाजताचा सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदार यायला सुरुवात झाली. मतदान कसे करावे, उमदेवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर दर्शनी भागात लावण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला. निवडणुकीत 22 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा