मुंबईः भाजप व शिंदे गटात अस्थिरता असल्याचा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. विरोधकांमध्ये राजकीय अस्तिरता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे प्रकरण न्यायालयात सुरु असून तो त्यांच्यासाठी अडचणीचा विषय आहे, असेही कडू (Former Minister Bachchu Kadu) म्हणाले. शिवसेना व धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक आयोगाकडे (Shive Sena and Election Symbol)सुरु असलेल्या सुनावणीवर भाष्य करताना कडू यांनी धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळेल, असा दावा केला. शिंदे गटाकडे आमदार, खासदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णय तपासल्यास धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळेल, असे ते म्हणाले. रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तारावरून बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना कडू यांनी भाजप व शिंदे गट तसेच विरोधकांच्या स्तरावरही राजकीय अस्थिरता असल्याचा दावा केलाय. या अस्थिरतेसाठी दोन्ही गटांची कारणे वेगवेगळी आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होणार असल्याचे कडू यांनी यावेळी सांगितले. एका मंत्र्याकडे अनेक खाती आहेत. त्यामुळे त्यांना कामाचा ताण येतोय. महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion ) व्हावा, अशी सरकारची मानसिकता असली तरी तो केव्हा होणार, हे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे कडू म्हणाले. कदाचित यामागे शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरील (Election Symbol) निर्णय हे कारण असू शकते. त्यावर निर्णय झाल्यास विस्तार होऊ शकतो, असेही ते म्हणाले.